✦ संस्थेचा उद्देश
- दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे.
- पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी विशेष प्रशिक्षण देणे.
- स्वावलंबनासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देणे.
- समाजामध्ये समान संधी व सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
✦ संस्थेविषयी थोडक्यात
संस्थेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक व पुनर्वसनात्मक उपक्रम राबविण्यात येतात. शाळेमार्फत त्यांना मोफत शिक्षण, आवश्यक सुविधा व तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाते. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
📋 शाळा माहिती
- प्रकार अस्थिव्यंग (निवासी)
- मान्यता राज्य शासन
- इयत्ता १ ली ते ७ वी / १ ते ४
⚡ उपलब्ध सुविधा (मोफत)
- मोफत शैक्षणिक साहित्य
- बसण्यासाठी फर्निचर
- फॅन व लाईटची व्यवस्था
- वर्ग खोल्या
- वर्गाची सजावट
- स्वतंत्र वसतीगृह
- सुगम्य शौचालय व स्नहगृह (गरम पाणी)
- इन्व्हटॅर ची व्यवस्था
- विविध खेळाचे साहित्य
- दवाखान्यासाठी वाहन सुविधा
- भोजन व स्वच्छ पिण्याचे पाणी
- प्रथम उपचार पेटी
- आरोग्य तपासणी (माहिनेवरी)
- दिव्यांग पुनर्वसन (वेगळया पद्धतीने)
- सी.सी.टीव्ही. व्यवस्था
- आवश्यक साहित्य
* सर्व सुविधा निवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत
❝ मुख्याध्यापकांचा संदेश ❞
प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो,
✦ आपल्या शाळेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. शारीरिक किंवा मानसिक मर्यादा म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे, तर एक नवीन सुरुवात आहे. आमची संस्था केवळ शिक्षण देत नाही, तर तुमच्यात स्वाभिमानाने जगण्याची जिद्द निर्माण करते.
✦ आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम आमचे शिक्षक आणि कर्मचारी अविरत करत आहेत. अपंगत्व हे शरीराला असते, मनाला नाही; आणि जिथे जिद्द आहे, तिथे यश नक्कीच मिळते.
✦ दिव्यांगत्व ही कमकुवतपणा नसून ती एक वेगळी क्षमता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत.
✦ शिक्षण, आत्मनिर्भरता आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अंगीकार करून, चला एक नवीन, प्रगल्भ उद्या घडवूया!
— मुख्याध्यापक
कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय